पुणे : महायुतीच्या बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी मतदारसंघात प्रचाराला सुरवात केली आहे. अशातच आज त्यांनी भोर मतदारसंघातील विविध ठिकाणी जाऊन नेत्यांच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यावेळी भोर येथील एका विद्यार्थ्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या घरी जाऊन सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाचं सात्वंन केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर शहर उपाध्यक्ष विशाल तुंगतकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवथरे, भोर शहराध्यक्ष केदार देशपांडे, युवकचे शहराध्यक्ष कुणाल धुमाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भोर येथील श्रवण नितीन इंजरकर याचे नुकतेच अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. विशाल हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. ७० सदस्यांच्या भल्या मोठ्या एकत्रित कुटुंबातील सर्वांचा लाडका असणाऱ्या श्रवणच्या या दुर्दैवी मृत्यूने इंजरकर (कुंभार) कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगात आज इंजरकर कुटुंबीयांची सुनेत्रा पवार यांनी सांत्वन केल्याचे पहायला मिळाले.
तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी आज भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन मांडके यांच्या भोर येथील निवासस्थानीही भेट दिली. यावेळी युवा मोर्चाचे पंकज खुर्द, भाजपाच्या जिल्हा प्रतिनिधी स्वाती गांधी, मच्छीमार आघाडीचे सुरेश कांबळे यांचीही भेट झाली. या सर्वांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केल्याचे सुनेत्रा पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-.
-महापालिका इन अॅक्शनमोड: शहरातील नाले, गटारे सफाई १० मे पर्यंतच करावीत, पालिका आयुक्तांच्या सूचना
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना
-“त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते तुमचा काय विकास करणार?”; अजित पवारांचा खोचक सवाल