पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गटांमध्ये विभागणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि शरद पवार गटात बारामती मतदारसंघासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चेने जोर धरला असतानाच आता मोठी अपडेट समोर आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या निवास्थानी भेट देत नवी समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कु यांनी भाजपच्या तिकिटावर मागील लोकसभा निवडणूक लढवली होती. सुप्रिया सुळे यांच्या विरोधातच त्यांनी जोरदार टक्कर दिली होती.
त्यामुळे दोन पिढ्यांपासून पवार व कुल घराण्याचे असलेले संबंध ताणून जवळपास तुटल्यातच जमा झाले होते. मात्र आता नव्या राजकीय परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून सुनेत्रा पवार यांनी कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. अजित पवार गटाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवार गटाकडून बारामती लोकसभेची जागा सुप्रिया सुळे याच लढवणार हे स्पष्ट आहे. बारामतीत यानिमित्ताने नणंद-भावजय असा सामना रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रक्षकच बनले भक्षक; गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी उकळले पैसे
-भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र; रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
-स्वयंघोषित स्टंटाबाजाचा व्हिडीओ व्हायरल; वाहतूक पोलिसांकडून शोध सुरु
-आदर पुनावाला यांना भारतरत्नही द्यावा; शरद पवारांचं केंद्राला आवाहन