पुणे : वादग्रस्त प्रशिक्षिणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार करत खळबळ उडवून दिली आहे. पूजा खेडकर यांनी दिवसेंवर केलेल्या आरोपाचा लेखी जबाब देण्यासाठी पुणे पोलिसांनी पूजा खेडकरांना नोटीस बजावली आहे. मात्र, पूजा खेडकर या पुण्यातील आयुक्तालयामध्ये हजर राहण्यासाठी सांगितले होते.
पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या पूजा खेडकर यांना बजावलेल्या नोटीस, पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर सुहास दिवसे यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच माध्यमांशी या विषयावर सविस्तर बोलणे टाळले आहे.
सुहास दिवसे म्हणाले की, ‘यावर बोलण्यासारखे काहीच नाही. तक्रारची प्रत मला मिळालेली नाही. त्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही.’ सुहास दिवसे यांनी ११ जुलै रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालानंतर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण रद्द करून त्यांना तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे बोलावण्यात आले आहे. २३ जुलैपूर्वी हजर व्हावेच लागेल, असे आदेशही खेडकर यांना दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मिळाला बुस्टर; निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य
-Pooja Khedkar: पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस; उद्या हजर राहणार का?
-भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे
-अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका
-महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!