पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आढळराव पाटील यांचे भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असता जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी आढळराव पाटील समर्थक व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटलांचे भोसरी विधानसभेतील मोशी येथे गाठी-भेटी घेतल्या. यावेळी आढळराव पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिति सदस्य विजय फुगे, पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिष बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश साने, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट आणि शिवयोद्धा ग्रुपचे अध्यक्ष गणेश सस्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला
-गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे
-डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकारी पक्ष, बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण; येत्या १० मे रोजी निकाल
-“शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस”; बावनकुळेंची पवारांवर सडकून टीका