पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची तोडफोड, गाड्या जाळणे आणि रस्त्यावर कोयता घेऊन दहशत पसरवण्याचे प्रकार घडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा सहभाग अनेकदा पुढे आलेला आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका देखील केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी पुणे शहरातील पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयात पार पडली. यावेळी गेल्या तीन वर्षातील घटनांचा आढावा घेऊन एक विशेष योजना राबविण्याचे ठरवण्यात आले आहे. वाहन तोडफोडी व जाळपोळीच्या घटनात 20 टक्के आरोपी हे अल्पवयीन असल्याचे पुढे आल्याने पुढील काळात अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपी आढळल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून दोषी मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्याचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.
दरम्यान, आजवर घडलेल्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींची यादी करून त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे, पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवावे तसेच त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवावे, मागील तीन वर्षांमध्ये वाहन तोडफोड, जाळपोळ या घटना शहरातील कोणत्या कोणत्या भागात घडल्या आहेत ते परिसर देखरेखीखाली आणले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही
-वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा
-लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची बदली; आता ‘हे’ असणार नवे पालिका आयुक्त
-‘तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री’; पुण्यातील पोस्टरची सर्वत्र चर्चा
-‘अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक’; सुप्रिया सुळेंनी दादांना धरलं धारेवर