पुणे : समाविष्ट गावांमधील नागरिकांना मिळकतकर व दंडापोटीची रक्कम जादा आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच अतिक्रमण कारवाईदेखील केली जात आहे. यामुळे ३४ गावांमधील नागरिक आणि सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या आहेत.
समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे. थकबाकी सक्तीने वसूल केली जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोब बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल तोपर्यंत महापालिकेने थकबाकी वसुली थांबवावी, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
मिळकतकर थकबाकी, अतिक्रमण कारवाई, पाणी प्रश्न अशा विविध समस्यांचा नागरिकांनी पाढा वाचला. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘समाविष्ट गावांसह थकबाकीदार नागरिकांकडून सक्तीने मिळकतकर वसूल करणे, मालमत्ता जप्तीच्या तक्रारी नागरिक करत आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.”
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचा महत्वाचा निर्यण
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांकडून विश्रांतवाडीत एमडीसाठी लागणारा ३६० किलो कच्चा माल जप्त
-“अजितदादा हळूच मला गृहखातं मागतील पण मी ते माझ्याकडेच ठेवणार”; फडणवीसांचा मिश्किल टोला
-“छत्रपती संभाजी महाराज एकही ‘निवडणूक’ हरले नव्हते”; अजित पवारांकडून भाषणात झाली चूक
-कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम