पुणे : नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराज यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाशिकमध्ये भद्रकाली परिसरातील साक्षी मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराजांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यावरुन राष्ट्रावादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाशिक पोलिसांना पत्र लिहले आहे.
“आपण आत्मा आहोत, शरीर नाही. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही”, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन आता नवा वाद उभा राहिला आहे.
कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. प्रकरणी पोलीस आयुक्त नाशिक यांना… pic.twitter.com/BdiHHKV1gH
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 31, 2024
कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. प्रकरणी पोलीस आयुक्त नाशिक यांना नियमानुसार चौकशी करून कारवाई करत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत”, असे रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी
-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”