पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या एफसी रोडवरील एल थ्री हॉटेलमध्ये रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टीचे सुरु होती. याबाबत २ तरुणांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ड्रग्ज पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच पार्टीत अल्पवयीन मुले सामील झाली होती.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एल थ्री बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. एल थ्री बारमधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
पोलिसांनी लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा.शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवि माहेश्वरी (रा. उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), ध्वनिक्षेपक यंत्रणा सांभाळणारा (डीजे) दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. हडपसर) आणि मानस मलिक (रा. येरवडा) यांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चहा, कॉफीचे शौकीन आहात? तुम्हाला चहा, कॉफी पिल्याने होणारे ‘हे’ तोटे माहिती आहेत का?
-Pune Hit & Run: पोर्शे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
-पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन धंगेकरांची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘पोलिसांवर कारवाई म्हणजे..’
-‘पुणे शहर भयमुक्त करा, जमत नसेल तर पायउतार व्हा’; राष्ट्रवादीचा शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
-केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या प्रयत्नानंतर पुणे विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी