पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन शहरात पब आणि बारसंदर्भाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. बार आणि पबमुळे रात्री अपरात्री धिंगणा अनेक अनुचित प्रकार घडत असतात. आतापर्यंत अनेक अपघातही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब आणि बारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विभागाच्या उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पब, बारसाठी काय नियम आणि काय कारवाई केली जाणार?
- परवाना कक्षामध्ये २१/२५ वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे.
- उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार
- शहरी भागात दीड वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात ११ वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- महिला वेटरेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना.
- हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार आहे.
- तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-१ ट्रेड मधुन Cash and Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.
- या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, शहरात झालेल्या एका अपघातामुळे सर्व प्रशासनाकडे सर्वांनी बोट दाखवले आहे. या प्रकरणावरुन पब, बार, ससून रुग्णालय प्रशासन, पुणे वाहतूक पोलीस, पुणे पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे अपघात प्रकरण चिघळल्यानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून कडक कारवाई करण्यास सुरवातही केली आहे. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार आणि रेस्टोरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तुमची मुले मोबाईलमध्ये अडल्ट Video पाहतात का? मग आजच मोबाईचे ‘हे’ सेटिंग्ज चेंज करा
-महिलांसाठी महत्वाची बातमी; दरवर्षी करा ‘या’ ६ मेडिकल टेस्ट नक्कीच करा, टळू शकतो गंभीर आजारांचा धोका
-पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर; चर्चेला उधाण
-Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे
-पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप