पुणे : पुण्यात आगामी लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या २ महिन्यात २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ वारस गुन्ह्यांची नोंद व ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने असा २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून ९७ लाख ७१ हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर ४१ प्रकरणात नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.
१ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले. त्यामधील ४६८ आरोपीना अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना ५ लाख ८३ हजार १०० रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांच्या मागणीला फडणवीसांचा बूस्टर; पुण्यासाठी एका फटक्यात आणला २०० कोटींचा निधी
-बारामती बसस्टँडच्या उद्घाटनाचे आमंत्रण नाही; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत तो प्रोटोकॉल…..”
-पुणे ड्रग्ज रॅकेट! कुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून विमानाने १४० किलो मेफेड्रोन लंडनला रवाना
-ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’
-आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले