मुंबई : लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर आजच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक झाली. यानंतर आता शिंदे सरकरचा पुढील आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आता माहिती समोर आली आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांना लॉटरी लागणार याबाबतची उत्सुकता आहे.
याच मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील दिल्लीला जाणार असल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी देखील या चर्चांना उधाण आले होते. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. मात्र, आता पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मंत्रिमंडळ विस्तार न केल्याचे बोलले जात आहे. त्याता आता भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार, हे पाहणे महत्वाचे आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांमध्ये धूसफूस होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी; विश्वजीत कदमांची बंधूसाठी फिल्डिंग?
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’त महत्वाचे ५ बदल; जाणून घ्या नव्या जीआरप्रमाणे काय आहेत बदल?
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश