श्री स्वामी समर्थ : श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. प्रत्येक्याच्या दैनंदिन जीवनात काहीना काही अडचणी जरूर असतातच. पण प्रत्येक अडचणीत देव आपल्या पाठीशी असता. स्वामी समर्थ महाराजांचे ब्रीदवाक्यच आहे, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”
सुख, समाधान, शांती आणि आनंद म्हणजे ऐश्वर्य; नीती, न्याय आणि कृपा हा झाला धर्म; सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी म्हणजेच यश; निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव; निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव म्हणजे ज्ञान आणि हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य, असे स्वामी म्हणतात. स्वामी महाराज आजच्या उपदेशात काय सांगतात हे आपण जाणून घेऊया….
स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात तुम्ही आलात की स्वामी महाराज जे तुमचे भोग आहेत. ते भोग संपवतात, आणि मग तुम्हाला जवळ करतात. जसं जिवाला कर्माच्या भट्टीत टाकून सद्गुरु भोगरुपी गाळ बाजूला काढतात. जो सात्विक म्हणून राहतो त्याला स्वामी भक्त म्हणून स्विकारतात.
आयुष्यात कितीही कोणत्याही अडचणी, संकट, दु:ख आले तरीही त्यांना सोडवण्यासाठी विनवणी करु नका. फक्त हात जोडून हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकंच महाराजांना सांगा. स्वामी महाराज वत्सल आहे. त्यामुळे तुमचे कर्म पुढे ढकलतीलही…
“जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही. हे कधीच विसरू नका.”
दु:ख तर सर्वांनाच असते. देवावर श्रद्धा, विश्वास, प्रेम असेल तर कोणत्याही संकटात देव तुम्हाला कधीही एकटं टाकणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ
-देशात पुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री; गेल्या तीन महिन्यात १ लाखांपेक्षा जास्त घरे विक्री