पुणे : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ महिलांना घेता यावा म्हणून कोथरुडमधील महिलांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. चंद्रकात पाटील यांनी आपल्या कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला आहे. कोथरुडमधील असंख्य महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील सेतू आणि तहसील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली आहे. कोथरुडमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत केली जात आहे. त्यामुळे कोथरुडमधील महिलांची चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? आज मोरेंचा मोर्चा ‘मातोश्री’वर
-लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण
-‘आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला महिन्याला…’; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंवर प्रत्युत्तर
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’बाबत देवेंद्र फडणवीसांचे महिलांना आवाहन; म्हणाले, ‘एजंटच्या…’