पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. अमोल कोल्हे यांना मागील निवडणुकीत भोसरी आणि हडपसरमधून मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे कोल्हे यांनी भोसरीकडे विशेष लक्ष घातले आहे. भोसरीमध्ये सातत्याने दौरे, प्रचार फेऱ्या वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही मताधिक्य कायम राहावे, यासाठी आढळराव पाटील हे भोसरीमधील प्रचाराकडे विशेष लक्ष देत असल्याचे पहायला मिळत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिरुरचा लोकसभा मतदारसंघ येतो. २०१९च्या निवडणुकीतही अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये लढत होत आहे. आढळराव-पाटील यांना भोसरीतून ३७ हजार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून पाच हजार ३७० मतांची आघाडी मिळाली होती.
शहरात असलेल्या या दोन्ही मतदारसंघातच आढळरावांना आघाडी होती, तर डॉ. कोल्हे पिछाडीवर होते. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. डॉ. कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून, तर आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. शिरूरमधील ६ पैकी ५ आमदार महायुतीचे आहेत. केवळ शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे डॉ. कोल्हे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे कागदावर महायुतीची ताकत दिसत आहे. कागदावर महायुतीची जास्त ताकत असल्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरीकडे विशेष लक्ष दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?
-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार
-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत
-‘आढळराव पाटील फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत’; अमोल कोल्हेंचा आरोप