Sholay : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतला हिंदी चित्रपट म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाची आजवर कोणत्याही चित्रपटासोबत करण्यात आली नाही. या सिनेमाचा रेकॉर्ड आजवर कोणताही सिनेमा करु शकला नाही. शोले हा चित्रपट हा १९७५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली आहे. मात्र आता विजय थलापतीच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा धुमाकूळ घातला आहे की ‘शोले’ चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
विजय थलापती या अभिनेत्याचा ‘घिल्ली’ हा चित्रपट २००४ मध्ये पहिल्यांदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता २० वर्षांनी पुन्हा एकदा हा सुपरहिट चित्रपट सिनेमागृहात रिलीज केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पुन्हा तितकाच चांगला प्रतिसाद दिला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘घिल्ली’ या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे.
‘घिल्ली’ हा २००३ मध्ये आलेल्या ‘ओक्काडु’ या तेलुगू हिट चित्रपटाचा रीमेक करण्यात आला. आणि हा चित्रपट २० एप्रिल २०२४ रोजी ‘घिल्ली’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला. री-रिलीजला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, ‘घिल्ली’ने री-रिलीजच्या ९ दिवसांत बॉक्स ऑफिसवर २० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रि-रिलीज कलेक्शनमध्ये ‘घिल्ली’ या चित्रपटाने ‘शोले’ आणि ‘टायटॅनिक’ सारख्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता २० वर्ष पूर्ण झाली आहेत. रिलीजच्या २० वर्षानंतर तामिळनाडू आणि इतर काही ठिकाणी पुन्हा एकदा सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha | ‘मतदानाच्या दिवशी कामगारांना फुल पगारी सुट्टी द्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
-हडपसरमध्ये आढळराव पाटलांची सरसी, रॅलीला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद
-“होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण…” शरद पवारांचे मोदींना खरमरीत उत्तर
-मावळात ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारांच्या गर्दीमुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली
-Shirur | बारामतीची पुनरावृत्ती शिरूर लोकसभेत; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढली