पुणे : रेल्वे संदर्भातील पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे संबंधित विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. पुणे ते दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे ते अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल अशा अनेक विषयांवर मुरलीधर मोहोळ यांनी मंत्री वैष्णव यांच्याशी चर्चा केली.
मोहोळ आणि वैष्णव यांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने ‘वंदे भारत स्लिपर ट्रेन’बाबत चर्चा झाली. आजच लोकसभेतील भाषणामध्ये रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्वाच्या महानगरांना जोडणारी ‘वंदे भारत मेट्रो सेवा’ लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने पुण्याहून नाशिक, सोलापूर, मुंबई या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा, या संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
Called on Union Minister for Railways Shri. Ahwini Vaishnaw ji at Rail Bhavan, New Delhi. Multiple development prospects pertaining to Railways such as ‘Pune-Delhi Vande Bharat Sleeper Train Services’, ‘Pune-Lonavla Railway line expansion’, ‘Pune-Ahilyanagar Railway… pic.twitter.com/IdJvw5rYdK
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 1, 2024
पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेसंदर्भात असलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. या भेटीमध्ये रेल्वेमंत्र्यांनी सर्व विषयांना सकारात्मक प्रतिसाद देत चर्चेतील सर्व विकासकार्यांबद्दल रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यवाहीची तसेच भविष्यातील नियोजनाची माहिती दिल्याचे मोहोळांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरच पुणे रेल्वेबाबतचे प्रश्न सुटणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Kasba Vidhansabha: मैदानात कोण उतरणार? भाजपसह काँग्रेस, शिवसेना, मनसेत इच्छुकांची भाऊगर्दी
-मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा
-उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरुन चंद्रकांत पाटलांचा सणसणीत टोला; म्हणाले, ‘त्यांच्या भाषणात…’
-पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्य पदाचा तिढा काही सुटेना!
-अजित पवारांविरोधात शरद पवारांची खेळी; ‘या’ तरुणांना मिळणार तुतारीकडून संधी