मावळ : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघांची मतदान प्रक्रिया आता सुरु आहे. सकाळी ७ वाजेपासून ते संंध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरु आहे. अनेक ठिकाणी नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे पहायला मिळत आहे.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले. त्यानंतर सोनालीने सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. ‘सर्वांनी घरातून बाहेर पडावे आणि मतदान करावे. मी केले सर्वांनी मतदान करावे’, असे आवाहन करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे.
The face is of pride!
I’m proud to have fulfilled my responsibility.
Have done it yet?कर्तव्य आणि अधिकार – नाण्याच्या दोन बाजू.
कर्तव्य पार पाडल्या शिवाय अधिकार मिळत नाही.
लक्षात असूद्या. मतदान करा. #castyourvote#sonaleekulkarni #celebratingDemocracy pic.twitter.com/gMOeOt6dPQ— Sonalee Kulkarni (@meSonalee) May 13, 2024
“मतदानादिवशी मतदार इकडे तिकडे फिरायला जातात असे मला वाटत नाही. लोक मतदान करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. त्यामुळे कोणाला मत द्यावे, का द्यावे, त्यातून का होणार आहे पुढे असे बरेच प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तर द्यायचे असेल, किंबहुना हे का घडतेय, त्याच्या बद्दल प्रश्न विचारायचे असतील, तक्रारी करायच्या असतील तर मतदानाचा हक्क बजवावा”, असेही सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-७०० रुपयांचे आंबे मिळणार ३०० रुपयांत, फक्त करा मतदान; पहा पुण्यात कुठे मिळणार ही भन्नाट ऑफर
-धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?
-राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?