पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत पानसे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. यावरुन मनसेमधून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेल्या वसंत मोरे यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे. वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
काय आहे वसंत मोरेंची पोस्ट?
“कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली” असे वसंत मोरे म्हणाले आहेत. वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला होता.
कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली… pic.twitter.com/B1z2LXdNST
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 7, 2024
राज ठाकरे यांच्या या निर्णयावरुन मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. राज ठाकरे यांनी आणखी एका निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी राज ठाकरे आणि मनसेला खोचक टोला लगावला आहे. यावर मनसेकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोण होणार पुण्याचा आरटीओ? ‘या’ दोघांच्या नावाची होतेय जोरदार चर्चा
-महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या हस्ते लाल महालात ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा
-ठरलं तर! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी होणार विराजमान
-“‘त्या’ दडपशाहीला मतदारांनी नाकारले”; लोकसभा निकालनंतर सु्प्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा
-बारामतीच्या पराभवाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळेच…’