सोलापूर : सध्याच्या काळात लोक आपली मर्यादा विसरु लागले आहेत. कधी पूर्वी मुलींना मुलांकडून लैगिंक छळ होत असायचे पण अलिकडे सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार, वडिलांकडून, काकांकडून, मामाकडून अत्याचार, लैगिंक छळ, बलात्कार अशा विचित्र घटना ऐकायला मिळतात. तसेच गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक लावणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोलापूमध्ये गुरुने आपली मर्यादा ओलांडत विद्यार्थीनीला चक्क प्रपोज केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.
सोलापूरमधील नामांकित शाळेतील यल्लाप्पा उर्फ सुमित गाडेकर या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनाला ‘तू मला सोडून जाऊ नकोस. नाही तर मी काहीतरी बरे वाईट करुन घेईल’, असं म्हणत विद्यार्थीनीला मानसिक त्रास दिला असल्याचं पीडित मुलीने सांगितले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन आरोपी सुमित गाडेकरवर ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
शिक्षकाने अल्पवयीन मुलीला मला सोडून जाऊ नकोस, असं म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीनीने नकार दिल्यानंतर सतत तिचा पाठलाग करत होता. जबरदस्ती तिचा हात धरुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम शिक्षकावर कलम १२ सह भारतीय न्याय संहिता कलम ७८,७४, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. तर दुसरीकडे असे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरातून संतापाची लाट उसळत आहे तर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही….’; सुषमा अंधारे थेटच बोलल्या
-महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…
-लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा
-GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली