बारामती : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, जागांचा तिढा न सुटल्याने वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. ही भूमिका घेताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
वंचित बहुजन आघाडीने पुण्यामध्ये वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी बारामतीमधून उमेदवार का दिला नाही? याबाबत खुलासा केला आहे.
“बारामतीमध्ये उमेदवार न देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नव्हती. पण, सुप्रिया सुळे या मला भेटल्या होत्या. आता त्या कुठे भेटल्या याचा वेळ-काळ विचारू नका. हा निर्णय आम्ही भविष्यातील काही राजकीय धोरण लक्षात घेऊन घेतला आहे. काही निर्णय भावूक नाही, तर धोरणाच्या दृष्टिकोनातून घ्यायचे असतात”, असं प्रकाश आंबडेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले
-“केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी भरपूर काही दिलंय”- मुरलीधर मोहोळ
-‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार