पुणे : युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) यांनी नुकतेच केलेल्या नवीन रिसर्चनुसार एक सिगारेट ओढल्यामुळे जीवनातील 20 मिनिटांचे आयुष्य कमी होते. रिसर्चनुसार एक सिगारेट ओढल्यामुळे पुरुषांचे आयुष्य 17 मिनिटांनी तर महिलांचे 22 मिनिटांनी कमी होते. त्यामुळे जेवढे लवकर सिगारेट सोडाल तेवढे जास्त उत्तम. ब्रिटनच्या आरोग्य खात्यासाठी युनिव्हर्सिटी कॉ लेज लंडन यांनी केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष पुढे आला आहे.
धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीने निश्चय केल्यास सिगारेटचे व्यसन लवकर सुटूही शकते. समजा नवीन वर्षात 1 जानेवारीला सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतल्यास 8 जानेवारीपर्यंत एक दिवसाचे तर 20 फेब्रुवारीपर्यंत आयुष्यातील एक आठवडा पुन्हा मिळवू शकतो, असेही पुढे आले आहे.
जगभरात दरवर्षी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे 80 लाख मृत्यू होतात. यामध्ये सिगारेट न ओढणारे परंतु इतर व्यवनांमुळे जीव गमवावा लागलेले 13 लाख लोकांचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune News: थर्टी फर्स्टला फुल तर्राट, हॉटेल सोडणार थेट घरात
-Big Breaking: वाल्मिक कराड स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण
-न्यू ईयरसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दारु पिऊन गाडी चालवाल्यास….
-पुणे पोलीस म्हणतात 31 डिसेंबरसाठी आम्हीही तयार, CCTV करणार लाईव्ह मॉनिटरिंग अन् मद्यपींवर…
-दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांच्या आमदाराचे सूचक विधान