पुणे : अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याशी, परिस्थितीसोबत संघर्ष करत असतात. कठिण परिस्थितीवर मात करुन ते लोक पुढे जाण्याचा प्रयत्न आकंताने करत असतात. त्यांच्या स्वप्नातील चमक पाहून त्यांचे पालकही त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात. अशीच एक कहाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील एका छोट्या गावातील सिमरन थोरातची कहाणी आहे.
सिमनर थोरातचंही अनेकांसारखंच एक स्वप्न होतं. सिमरनला साता समुद्रापार जाण्याचं आणि समुद्रावर स्वार होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण हे स्वप्न पूर्ण करणं सिमरनसाठी सोपी गोष्ट नव्हती. सिमरनलला मर्चंट नव्हीमध्ये काम करायचं होतं. यासाठी पुण्यातील सदर शिक्षणाचा ३ वर्षाचा कोर्स सिमरने केला. या कोर्सचे शैक्षणिक शुल्क हे ९ लाख रुपये आहे. सिमरनचे आई-वडिल तालुक्याच्या बाहेर फारसे गेले नव्हते पण मुलीला सातासमुद्रापार पाठवण्यासाठी आपली ३ एकर शेतजमीन विकली आहे. ज्या शेतात मका, गहू, आणि ऊस पिकवून कुटुंबाचा गाडा चालत होता.
सन २०१९मध्ये तिची कॉलेजमधूनच व्हँकुव्हर येथील (कॅनडा) ‘सिस्पन शिप मॅनेजमेंट’ या कंपनीत निवड झाली. तिने बीएसस्सी नॉटिकल सायन्स ही पदवी घेतली. या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. मात्र, भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी असल्याने इतिहास घडला. तिच्या यशस्वी कामगिरीनंतर अनेक भारतीय मुलींची निवड करण्यात आली. तिने २०१९ मध्येच जहाज ट्रेनी (डेक कॅडेट) म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तिने पुढील परीक्षा देऊन लायसन्स मिळवले. त्यानंतर तिची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून ‘सिस्पन’मध्ये निवड झाली.
“माझ्या आईने दहावीपर्यंतचेही शिक्षण घेतलेले नाही. तरीही तिने माझ्यासाठी वडिलांची समजूत घातली. माझ्या भावाच्या शिक्षणासाठी वडिलांनी आधीच जमिनीचा एक तुकडा विकला होता. आता माझ्या शिक्षणासाठी उरली-सुरली जमिनही विकून टाकली. जमीन विकल्यानंतर माझे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करू लागले, ज्याचे आयटीआयमधून त्यांनी शिक्षण घेतले. तर आईने इंदापूरच्या फरेरो चॉकलेट फॅक्टरीत काम करण्यास सुरुवात केली. माझ्या आई-वडिलांच्या त्यागामुळे मी आज पुणे जिल्ह्यातील प्रथम मर्चंट नेव्ही ऑफिसर झाली आहे. तसेच माझ्या सीसपॅन कंपनीतील मी एकमेव महिला अधिकारी आहे”, असं म्हणत सिमरन थोरात म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे
-एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या
-धंगेकरांना आणखी एक धक्का, काँग्रेसचे निष्ठावान आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला; नेमकं घडलं काय?
-सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; ठाकरे गटात नाराजीची लाट