“श्री स्वामी समर्थ”
श्री स्वामी समर्थ : श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्तसंप्रदाय अत्यंत प्रेमळ आणि समर्पित आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना प्रेम, विश्वास, आणि आध्यात्मिक मार्गदर्शन नेहमीच देत असतात. तसेच स्वामींचे भक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना आपल्या जीवनातील मार्गदर्शक मानतात. स्वामींच्या उपदेशांवर आणि त्यांच्या आशिर्वादावर विश्वास ठेवून स्वामी भक्त त्यांच्या समस्यांचे समाधान शोधत असतात. स्वामी नेहमीच भक्तांना सांगत की, “खरं प्रेम म्हणजेच परमेश्वराशी एकतेचं नातं.” स्वामी नेहमीच भक्तांना निस्वार्थ प्रेम, आनंदी जीवन जगण्याचे उपदेश देत असतात. असेच काही उपदेश स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिले आहेत. तेच आज आपण पाहणार आहोत.
जर स्वामींचं नाव आपल्या ओठी कायम असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. त्यांचे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्यच आपल्याला नवी उर्जा आणि ताकद देत असतात. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगत होते की, “मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. जर तू माझं नाव भक्तीने घेत असशील तर तुला कशाचीच भीती वाटणार नाही. मी तुम्हाला सदैव तुला साथ देईल.”
स्वामी महाराजांचे हे ब्रीदवाक्य भक्तांना नेहमीच धीर आणि आत्मविश्वास देत असते. स्वामी महाराज सांगतात की, ‘जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करतो, तेव्हा तो त्यांच्या आशीर्वादाचा भाग होतो. त्या आशीर्वादामुळे आपण कोणत्याही अडचणींना सहज सामोरे जाऊ शकतो आणि तेच भक्ताच्या जीवनातील मार्गदर्शक होतात.’
- स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेले आजचे ५ उपदेश कोणते?
-काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील भाग्य लागतं.
-फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडया कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे लोक सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कोणीच अडवू शकत नाही.
-यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मग आपलंही भल झाल्याशिवाय राहणार नाही.
-कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही तसेच कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
-‘तुझ्या अंतरात्म्यात मी आहे. तुला कधीच हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंझ तू खेळतो आहेस मनाशी, त्यातही तुला मार्ग दाखवत राहणार मी.’