श्री स्वामी समर्थ : श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांवर आपली कृपा कायम ठेवतात. आपल्या प्रत्येक भक्तांच्या प्रत्येक अडचणींमध्ये साथ देत असतात. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी उपदेश देत असतात. आजच्या उपदेशामध्ये स्वामी काय सांगतात हे पाहणार आहोत. स्वामी सांगतात की, स्वत:वर विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी देखील कुठेतरी चांगलं घडत असतं. फरक इतकाच की ते आपल्याला दिसत नसतं.
मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य ८४ लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर मनुष्याला अहंकार नसावा.
अ-शाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्त नाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहिल. पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको.
कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे, तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकड करणार नाही.
मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचाली तील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !
दुसऱ्याचं ऐका, पण आचारात आनण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका.
शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मा मुळे येतात. गुरुकृपे मुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते.
महत्वाच्या बातम्या-
-IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस
-विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या आमदारांनी कोणते मंत्रिपद?