श्री स्वामी समर्थ : स्वामी महाराजांचा भक्त संप्रदाय खूप मोठा आहे. भगवंताचे स्मरणपूर्वक नाम घेणं म्हणजे नामस्मरण करणे. आणि असेच भक्त करु लागला की अंतर्गासह बाह्यअंगात म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल झाल्याची भक्तांना जाणीव होते. वाणी मृदू होते. आचरणामध्ये कायम सदाचार येतो. अंतकरण हळवं होतं. इतकंच नव्हे तर जागृत आणि निद्रावस्थेत असतानाही विवेक जागा असल्याची स्पष्ट प्रचिती भक्तांना येते. मग भक्त म्हणू लागतो, तुझे नाम आले ओठी सूर भारावले….श्री स्वामी समर्थ…..
माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते.
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्या नंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. वेळीच किंमत करा.
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत, राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यानंतर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील.
अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे.जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.
अरे कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं, ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय
-१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा
-मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण