पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी १३ मे रोजी होणार आहे. सर्व प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. मतदान करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. मतदान जनजागृतीसाठी पुणेकरांनी मतदान करावे या उद्देशाने पुण्यात अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका आईस्क्रिम पार्लरकडून मतदान करणाऱ्या नागरिकांना आईस्क्रिम अर्ध्या किंमतीत मिळणार आहे. त्यातच आता फूड डिलिव्हरीकडून देखील अशीच ऑफर देण्यात आली आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावं, यासाठी स्विगीकडून खास ऑफर देण्यात आली आहे. स्विगी डाइनआऊटची पुण्यात मतदानाच्या दिवशी आकर्षक डायनिंग ऑफर देणार आहेत. मतदारांनी मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवले तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा यामागचा उद्देश आहे.
१३ मे रोजी सोमवारी पुण्यात मतदान आहे. त्यानिमित्त स्विगी डाइन आऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. स्विगीने मोठ्या हॉटेलमध्ये मतदारांना आकर्षक सूट दिली आहे. १३ मे रोजी शाई लावलेले बोट दाखवून पुणेकरांना जेवण्याच्या बिलात ५० टक्क्यांची सूट मिळेल. एफिंगट बिस्ट्रो, सर्किट हाऊ, द मार्केट- द वेस्टिन, इस्काडा ऑल डे किचन अँड बार, स्काय स्टोरीज, सर्किट हाऊस अशा अनेक हॉटेल्समध्ये ही ऑफर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरेंचा फतवा अन् पुण्यात वातावरण पेटले! सोशल मीडियावर “आमचं ठरलंय”चा ट्रेंड; फायदा कुणाला?
-‘मी चुकलो, मला माफ करा, पण आता ती चूक…’; भर पावसात का मागितली अजितदादांनी माफी?
-‘पुण्याला सर्वोत्कृष्ट शहर बणवणार, मतदारांचा मतरूपी आशीर्वाद मला मिळेल’; मोहोळांचा विश्वास
-‘ही देशाची निवडणूक, गल्लीतला नाही तर दिल्लीतला नेता निवडायचाय!’ पुण्यातील सांगता सभेत फडणवीस बरसले
-‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा