पुणे : बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारावरुन सध्या सर्वत्र संतप्त वातावरण आहे. अशातच या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रातही पडले आहेत. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘बदलापूर येथे घडलेली दुर्दैवी घटनेत सरकारने पुढे येऊन फास्टट्रॅक कोर्ट मध्ये एकदा तरी अशी शिक्षा व्हायला हवी की जेणेकरून अशी घटना परत करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. अशा प्रकरणातील आरोपींना जेव्हा फाशीची शिक्षा होईल तेव्हाच असे घाणेरडे कृत्य करण्याआधी दहा वेळा नाही तर शंभर वेळा विचार करेल. कायद्याची जरूर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये बसली पाहिजे. साठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई केली पाहिजे’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
‘लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयांची योजना आणणाऱ्या सरकारने प्रथम राज्यातील महिलांना सुरक्षा प्रदान करावी. जर राज्यातील लेकींना सुरक्षा देता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा’, अशी आग्रही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आंदोलनावेळी राजीनाम्याच्या फलकावरुन अजित पवारांनीही राजीनामा द्यावा का असा प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंनी उत्तर देणे टाळले आणि प्रशांत जगताप यांना भूमिका मांडण्यास सांगितले.
राज्याची पोलिस यंत्रणा एवढी सक्षम आणि कार्यक्षम आहे त्यावर मला किंचितही अविश्वास नाही. मात्र आज राज्यात क्राईम, अपघात, कोयता गँग सारख्या घटना राजरोस घडत आहेत. या पोलिसांचा सन्मान मी आदर्श पोलीस म्हणून होत असल्याचे अगदी बालपणापासून बघत आली आहे. आज देशातील सगळ्यात चांगले पोलीस म्हणून महाराष्ट्राच्या पोलिसांकडे बघितलं जातं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक
-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’
-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न