पुणे : मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यामध्ये देखील दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ एका इसमाने आर्थिक वादातून दुसऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबारनंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
ज्वेलर असणाऱ्या अनिल ढमालेने आकाश जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि मग स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे. या हल्ल्यात आकाश जाधव गंभीर जखमी असून आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे पुढे आलं आहे. औंध भागातील भाले चौकात हा प्रकार घडला.
आकाश जाधववर फायरींग केल्यानंतर ढमाले रिक्षातून जात असताना भाले चौक येथे स्वतःवर गोळी झाडली, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती रिक्षाचालकाने पोलिसांनी कळवली, यानंतर चतुर्श्रुंगी पोलिसांनी तात्काळ जागेवर धाव घेतली.
मयत अनिल ढमालेने गोळीबार करण्याआधी एक नोट लिहिली होती. तीन महिन्यांपासून जाधव आर्थिक कारणातून त्रास देत आहे. आता मला पर्याय नाही, त्यामुळे हा निर्णय घेत आहे, असं त्याने या नोटमध्ये लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वागळे हल्ला प्रकरण: भाजपचे दीपक पोटे, बापू मानकरांसह १० जणांना पोलिसांनी केली अटक
-‘पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी’; निखिल वागळेंना समर्थन देणारा नेता कोण?
-पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर ‘आप’चा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
-गाडीवरुन फटफट करत जाणं बुलेटस्वारांना भोवलं; पुणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
-“आता फक्त एकच दादा ते म्हणजे…” वागळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी