पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे गैरप्रकार समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ससूनमधील डॉक्टरांनी केलेला गैरकारभार उघडकीस आला आहे. ससून रुग्णालयामधील बेवारस रुग्णांवर उपचार करुन रात्रीच्या वेळी निर्जळस्थळी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले.
दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी गायकवाड त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेले असता ससून रूग्णालयातील तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलीस तपासामध्ये रुग्णाला डॉक्टरांना एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली. दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी आता येरवडा पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो, गुरवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार
-हिम्मत असेल तर शरद पवारांनी….; अमित शहांनंतर आता पुणे भाजपचं शरद पवारांना ओपन चॅलेंज
-‘तो’ कॉल मोरेंच्याच जवळील व्यक्तीने केला नाही ना? वसंत मोरे धमकी प्रकरणाला नवीन वळण
-पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी