पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील इतर भागात अलिकडे गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे. अनेक धक्कादायक घटना शहरात घडत असतात. एकीकडे कल्याणीनगर अपघातावरुन शहरातील वातावरण बिघडले आहे. अशातच रायगड तालुक्यातील कोंढवळे गावामध्ये जमिनीच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे.
रायगड तालुक्यातील कोंढवळे गावात ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ठ असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पद्धतीने ताबा घेण्यासाठी २५-३० जणांचा घोळका जेसीबी घेऊन आले. याच जेसीबीच्या साहाय्याने त्यांनी २२ वर्षीय मुलीच्या अंगावर माती टाकून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप २२ वर्षीय तरुणी आणि तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
‘पोलिसांसह काही जण जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले होते. तेव्हा तरुणी आणि त्यांच्यात झालेल्या वाद झाला. यादरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचे दिसत आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी
-मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर नेमकं कारण काय? म्हणाले….
-आरोपींना वाचवण्यासाठी नको ते उपद्वाप; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मध्यरात्री गाडीतून कोणाला आणलं?
-स्वा. सावरकरांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश