पुणे : मुंबईमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची पुण्यातही पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईतील प्रकरणी पालकांनी केलेल्या आंदोलनाला १ दिवसही उलटला नाही तोच पुण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीवर १९ वर्षीय तरुणाने १५ ऑगस्ट रोजी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यदिनी झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली. देवराज पदम आग्री (वय १९) असे आरोपी तरुणांचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवराज पदम आग्री आणि पीडित मुलगी हे दोघेही भवानी पेठेतील एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत.
आरोपी आणि पीडित या दोघांची ओळख असून १५ ऑगस्ट रोजी शाळेच्या दुसर्या मजल्यावर पीडित मुलगी बॅग घेण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी मुलगा हा स्वच्छतागृह जवळ लपून बसला होता. त्या ठिकाणी पीडित मुलगी येताच तिचा हात पकडून स्वच्छतागृहामध्ये घेऊन गेला. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले. त्यावेळी पीडित मुलाने आरोपीला धक्का देऊन तेथून पळ काढला.
महत्वाच्या बातम्या-
-तोंडाजवळ आलेला घास बँका घेतायत हिसकावून; लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला
-मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडी, इन्कम टॅक्सची कारवाई; पहाटेपासून कारवाई सुरु
-ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांच्या ‘या’ नेत्याने दिला डच्चू; ‘घड्याळा’ऐवजी हाती घेणार ‘मशाल’
-पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाची अपडेट; रक्ताचे नमुने बदल्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक