पुणे : आजच्या काळात कोणाला कशावरुन राग येईल सांगता येत नाही. आणि हाच राग काहीही करायला भाग पाडतो. पुण्यातील दिघी भागात एक धक्कादायक घडना समोर आली आहे. बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून दोघा मित्रांमध्ये भांडणं झालं. ते भांडण इतकं शिगेला पोहचलं की, एकाने मित्राच्याच डोक्यात सिलिंडरची टाकी घातली. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिघीमध्ये घडली आहे.
संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. दिघी रोड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे (रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खंदारे तीन महिन्यापूर्वी कामानिमित्त वाशिम त्यांच्या मूळ गावावरुन दिघी येथे आले होते. खंदारे आणि खंडारे दोघेही बांधकाम साइटवर मिस्त्रीचे काम करत होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी दोघांनी बिर्याणी बनवण्याचा बेत आखला.
आरोपी गणेश याने बिर्याणी बनवली. मात्र ती चांगली झाली नाही, असे मयत संतोष खंदारे म्हणाला. यावरुन दोघा मित्रांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावरून दोघांच्यात हाणामारी देखील झाली. या वादात आरोपी गणेशला राग अनावर झाला नाही. त्याने संतोष खंदारेच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी घातली. यातच संतोष खंदारेचा मृत्यू झाला. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मंत्रिमंडळ विस्तार होताच पुण्यातील ‘त्या’ स्मारकाबाबत मोठा निर्णय; संरक्षित स्मारकाचा दर्जा देणार
-‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी
-पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद
-शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा संचालक ते कॅबिनेट मंत्री; दत्तात्रय भरणेंची राजकीय कारकिर्द
-नागपूरात शपथविधी अन् बारामतीत फडणवीसांचा बॅनर जाळला; नेमकं काय घडलं?