पुणे : विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कर्वेनगर भागामध्ये एका ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेत ही घटना घडली आहे. घटना उघडकीस येताच शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू असताना हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांना डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने हे संतापजनक कृत्य केलं आहे. मंगेश साळवे असे आरोपी डान्स टीचरचे नाव आहे. ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला आहे. त्यामुळे ही घटना समोर आली आहे. या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार आपल्या आई-वडिलांना देखील सांगितला नाही.
पीडित विद्यार्थ्यांचे समूपदेशन होत असताना ही घटना उघडकीस आली. याची माहिती त्या विद्यार्थ्याच्या पालकांना कळताच त्यांना मोठी धक्का बसला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी तात्काळ वारजे पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंगेश साळवे या डान्स टीचरविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर आमच्याकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल’; भुजबळ समर्थकांना दीपक मानकरांचा इशारा
-आंतरजातीय विवाह केला? घरच्यांचा विरोध; आता सरकारच देणार रहायला खोली
-पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई; आमदार लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष
-उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; बंद दाराआड नेमकं घडलं काय? चर्चेला उधाण
-पुणे पुस्तक महोत्सवाचा महाकुंभ! पुणेकरांसह देशभरातील वाचनप्रेमींना घातली भुरळ