पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच शनिवारी (१जून) रोजी सकाळी पुणे पोलिसांना एक अद्यात व्यक्तीने फोन करून शनिवारवाडा येथे बॉम्ब असल्याचे सांगितले होते. ही अफवा पासरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारवाड्यात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रामहरी अश्रृ सातपुते (रा. चिंचपूर, ता. आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राकेश गायकवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातपुतेने शनिवारी (१ जून) पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला. शनिवारवाड्यातील प्रवेशद्वारात बाॅम्ब ठेवला असल्याची खोटी माहिती त्याने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाॅम्ब शोधक नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली. तेव्हा बाॅम्ब सदृश वस्तू आढळून आली.
पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास केला. तपाासात सातपुते याने दूरध्वनी करून खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिसांना झालंय तरी काय? नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून करुन चक्क पाय चेपून घेतले
-शिरुरचा खासदार कोण? एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील की अमोल कोल्हे मारणार बाजी
-मावळचा खासदार कोण होणार? सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव; वाचा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ
-पुण्यात मोहोळ धंगेकर अन् मोरेंमध्ये काटे की टक्कर, कोण होणार खासदार? एक्झिट पोलमध्ये मोहोळांची बाजी
-Baramati | एक्झिट पोलनुसार बारामतीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?