पुणे : राज्यभर सध्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन तसेच छत्रपती शिवाजी महारांच्या काळात वाघ्या कुत्रा अस्तित्वात होती की नाही? अशातच आता शिवधर्म फाऊंडेशनकडून ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाने कार्यरत असलेल्या संघटना आणि पक्षाकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ने नावात बदल करुन संघटनेचे नाव बदलावे अन्यथा राज्यभर आंदोलन करु’, असा इशारा शिवधर्म फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे.
‘संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन अवमान करत आहे. संघटनेने संभाजी ब्रिगेड’च्या नावात ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असे पूर्ण लिहावे. सरकारने सुद्धा या संघटनेची दखल घेऊन नाव बदलायला सांगावे, नाहीतर त्याची मान्यता रद्द करावी. जर वेळेत संघटनेने नाव बदलले नाही तर संभाजी ब्रिगेड’च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने येत्या ३ एप्रिलपासून राज्यभरात आंदोलन करणार’, असा इशारा शिवधर्म फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये शेतकरी, कर्जमाफी, वाढती महागाई, दुष्काळ या मुख्य प्रश्नांसोबतच अनेक प्रश्न राज्यात आहेत. तर दुसरीकडे इतिहासातील काही संदर्भ शोधले जात असून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता शिवधर्म फाऊंडेशनने संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. आता या मुद्द्यावरुन राज्याच्या राजकारणामध्ये काय पडसाद उमटतात? संभाजी ब्रिगेडकडून नाव बदलले जाते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी
-दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल
-पुण्यातील डॉक्टरचा प्रताप; पहिलं लग्न लपवलं दुसरंही केलं अन्…
-पुण्यातील बड्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोणा, नेमका प्रकार काय?