पुणे : शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे आमदार अमोल कोल्हे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाचे अध्यक्षपद देत लोकसभेच्या निवडणुकीतून पत्ता कट झाला अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेबाबत बोलताना आढळराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
“अमोल कोल्हे अपयश झाकण्यासाठी बेंबीच्या देठापासून भाषण करत आहेत. ५ वर्षात त्यांना काही जमलं नाही. मी मंजूर केलेली ५ बायपास रस्ते कामे माझीच आहेत. जो काम करत नाही ते क्रिडीट घेण्याच काम करत आहेत”, असा आरोप यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांनी केली आहे.
“बैलगाडा शर्यतसाठी मी काम केलं, त्यासाठी अनेकजणांनी आंदोलन केली आहेत. मी अमोल कोल्हे याच्यासारखे पक्ष बदलले नाहीत. अमोल कोल्हे यांनी अनेकदा पक्ष बदलले. ते नेते आहेत की अभिनेते त्याचे त्यांनाच माहिती. मी आहे त्याच शिवसेनेत आहे. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार”, अशी टीका आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-म्हाडाचे अध्यक्षपद पण लोकसभा उमेदवारीतून आढळरावांचा पत्ता कट???; म्हणाले….
-पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक
-राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा
-नसांच्या दुर्लक्षित स्थितीच्या उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीने सुरु केले ‘स्पेशलाईझ्ड क्लिनिक’