पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील सर्वात चर्चेत असणाऱ्या शिरुर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता आढळराव पाटलांवर अमोल कोल्हेंनी शरसंधान साधलं आहे.
आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत ७० पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले. कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार? कोणते कंत्राट कधी निघणार? अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला. याची माहिती घेतल्यावर समजले की,आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत”, असा गंभीर आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.
संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माजी खासदार संसदेत गेले असल्याचे अमोल कोल्हे पुन्हा एकदा म्हणाले आहेत. यावर आता आढळराव पाटील काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली, म्हणून…”; अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
-पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली
-वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प पथदर्शी ठरणार – मोहोळ
-“राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम असं मानणार्यांमध्ये हा संघर्ष”- प्रकाश जावडेकर
-अजित पवारांची भोरमध्ये “सर्जिकल स्ट्राइक”; शरद पवार गटाला मोठा धक्का