पुणे : शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. त्यांना हे पद देऊन लोकसभेच्या निवडणुकीतून त्यांचा पत्ता कट केला असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेबाबत बोलताना आढळराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“तुम्ही समजता तसं काही नाही, मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार. आपण समजत होतो किंवा लोक समजतात तसे नाही. संस्था कर्मचारी सगळं चागलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वस्तात गोरगरिबांना घरं देण्यासाठी चागलं काम करण्याची संधी आहे”, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्र्यांनी मला काम थांबवू नका, असं सागितले आहे. पण जो पक्ष देईल तो आदेश मानणार, काम करणार. मी शिवसैनिक आहे, अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल. शिरूरमधून सुनेत्रा पवार किंवा वळसे पाटील उभा राहतील असं वाटत नाही. मी माझा जास्त वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत होतो, लोकांच्या अडचणी सोडवत फिरत होतो. आज म्हाडा अध्यक्षपद स्वीकारलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली. पण आपल्या सर्वांना वाटतं पत्ता कट झाला की काय? पण तसे काही नाही”, असे सांगत पत्ता कट झाल्याच्या चर्चांना आढळराव पाटीलांनी पुर्णविराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक
-राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा
-नसांच्या दुर्लक्षित स्थितीच्या उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीने सुरु केले ‘स्पेशलाईझ्ड क्लिनिक’
-‘पुण्यात फडणवीस किंवा कोणी वरिष्ठ नेता ही निवडणूक लढो, जिंकणार मीच’- रविंद्र धंगेकर