पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अनेक मुद्दे उपस्थित कर टीका केली होती. यावर आता आढळराव पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. “निवडून दिल्यानंतर गेल्या पाच वर्षात आपले खासदार मतदारसंघात फिरकलेच नाहीत, शिरूर हा भारतातील एकमेव मतदार संघ होता की जिथे खासदारांची उपस्थिती नव्हती” असा टोला त्यांनी लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कवठे यमाई येथे आढळराव पाटील यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जनतेकडून आम्ही वचन घेतली म्हणून आम्ही प्रत्येक भागात गोरगरिबांसाठी जनता दरबार भरवले, ठीकठिकाणी माझी कार्यालय देखील लोकांसाठी खुली होती, मात्र मागच्या खासदाराने जनतेची मोठी निराशा केली. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाला खासदारच नव्हता, शिरूर हा भारतातील एकमेव मतदारसंघ होता की जिथे खासदार उपस्थित नव्हते”
दरम्यान, आढळराव पाटील यांच्याकडून आयोजित मेळाव्यात महायुतीच्या सर्व नेत्यांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना महायुतीच्या पाठीशी असलेला मायबाप जनतेचा पाठिंबा आपल्यासाठी अमूल्य असल्याचेही शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना