पुणे : बारामतीप्रमाणेच शिरुरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये लढत होत आहे. शिरुरमध्ये महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांकडून धडाक्यात प्रचार सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपूस केली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी दिलीप वळसे पाटलांचा पाय घसरून ते जमिनीवर पडले होते. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी गटातील आमदारांनी आढळरावांच्या प्रचारासाठी चांगल्याच बैठका सुरू केल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड आणि डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मंत्री दिलीप वळसे पाटील दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची विचारपूस करण्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपणा सर्वांना हे सांगताना अत्यंत समाधान वाटत आहे की, नामदार साहेबांची प्रकृती हळू हळू सुधारत आहे आणि लवकरच सक्रिय होऊन ते पुनः सगळा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. जनतेच्या आशिर्वादाने हे सगळं लवकरच शक्य होईल असा विश्वास दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार
-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत
-‘आढळराव पाटील फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत’; अमोल कोल्हेंचा आरोप
-“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली, म्हणून…”; अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर