पुणे : छत्रपती शिवाजी महारांज्या पदस्पर्थाने पावन झालेल्या भूमीमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ‘शिवजयंती महोत्सव समिती पुणे’च्या वतीने लालमहाल येथून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजांची मिरवणूक मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने पार पडत आहे. यंदाचे या मिरवणुकीचे १३वे वर्ष आहे.
‘जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष करत स्वराज्यातील सरदारांच्या घराण्यांतील वंशजांच्या हस्ते लालमहालमध्ये जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज रथावरील शिवज्योत प्रज्वलन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवमय वातावरणात मुख्य स्वराज्यसथा पाठोपाठ सरदार, मावळे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ रथ या मिरवणुकीमध्ये पहायला मिळतात.
View this post on Instagram
फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत, मुख्य स्वराज्यरथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे,मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना आणि ढोलताशा पथकाचं सुरेख वादन, तर सनई-चौघडयांचे मंगलमय सूराने पुण्यनगरी दुमदुमल्याचं पहायला मिळालं. तसेच हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला, चिमुरड्या शिवभक्तांनी मिरवणुकीला चार चाँद लावले.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली, पण बारामतीच्या तरुणीला ‘जीबीएस’नं गाठलं अन्…
-कोंढव्यात ‘मुस्लिम मावळा प्रतिष्ठान’कडून शिवजयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन
-तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली
-पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा