पुणे : पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे. आज सकाळी पुण्यातून वसंत मोरे यांनी गाड्यांचा ताफा आणि हातात भगवे झेंडे घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मोरेंनी ‘मातोश्री’कडे वाटचाल केली. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोरेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच वसंत मोरे यांनी टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेवर टीका केली आहे.
“शिवसेनेत स्वगृही परतलेल्या सर्व बांधवाचे स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंतराव काय करताय याकडे सर्वांचे लक्ष होते. काय करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. वसंत मोरे आधी शिवसैनिक होते. मधल्या काळात ते दुसऱ्या पक्षात गेले. इतर पक्षात सन्मान मिळतो का? काय वागणूक दिली जाते? याचा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होत आता ते स्वगृही परतले आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवबंधन बांधताच वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोरे म्हणाले की, “मी १६ व्या वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. पण १८ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे पद मिळाले नव्हते. बारावीची परिक्षा उत्तीर्ण होताच १९९२ साली कात्रजमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो होतो. आज माझ्याबरोबर अनेक लोक शिवसेनेत येत आहेत. मी मुळचा शिवेसनेचा असल्यामुळे माझा आज प्रवेश नाही तर मी स्वगृही परतलो आहे”, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
‘मला अनेकजण म्हणतात की, शिवसेनेत माझा प्रवेश आहे. परंतु, माझा प्रवेश नाही तर मी पुन्हा शिवसेनेत आलो आहे. २५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची ताकद उभी करू. १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष १ शहारध्यक्ष, दोन सचिव आणि महिला आघाडीच्या पाच शाख्याध्यक्ष यांच्या सर्वांसह मी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. १२ मार्च रोजी मी मनसेचा राजीनामा दिला तेव्हाच यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता, असेही वसंत मोरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे आज हाती शिवबंधन बांधणार; गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेऊन मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन
-मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत
-पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ भागात रेड अलर्ट