पुणे : राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
आळंदी येथे शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार बोलत होते. यावेळी संवाद मेळाव्यास महायुतीचे घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
“तीर्थक्षेत्र देहू आळंदीच्या विकासाबरोबर पालखी महामार्गाची विकासकामे मार्गी लावली आत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल. ही देशाची निवडणूक असल्याचे आढळराव पाटील यांना निवडून द्या, येथील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल”, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.
“आपण कोणत्याही प्रकारच्या शूटिंगला जाणार नाही. त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी तसेच मतदार संघातील उर्वरित विकास कामासाठी देणार आहे. आळंदी येथील देवस्थानच्या जागेत विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागेल. पुणे मेट्रो आळंदीपर्यंत आणण्यास प्रयत्न करायचे आहेत. मी मतदारसंघासाठी पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे, यामुळे निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये”, असे आवाहन आढळराव पाटलांनी मतदारांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुस्लिमांची जमीन वाचवली त्यांनाच पाठिंबा; अनिस सुंडकेंसाठी एकवटले मुस्लिम धर्मगुरू
-मतदानाला उरले तीन दिवस; पुण्यात कोण ठरतंय सरस? नेमकी परिस्थिती काय, नक्की वाचा
-राज ठाकरेंच्या सभेनिमित्त वाहतूकीत बदल; जाणून घ्या कशी आहे वाहतूक व्यवस्था?
-पवारांच्या आमदाराला अजित दादांचं चॅलेंज; म्हणाले, “अरे मंत्री बनायला निघाला पण आता आमदार कसा होतो…”