पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी शिरुर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत होतत आहे. अमोल कोल्हेंना आढळराव पाटलांनी खुलं आव्हान दिलंं होतं. त्यातच आता आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंच्या लढाईत आता भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रवीण दरेकर यांनी अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली आहे.
”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘ कोल्हे कुई‘ आपल्याला आता थांबवायची आहे” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे. “खासदार हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही. म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार पाठवा, असे आवाहन प्रविण दरेकरांनी मतदारांना केले आहे.
“प्रचाराच्या माध्यमातून येथील विरोधक फक्त डायलॉग बाजी करतात, जुनी उणीदुणी काढायचा प्रयत्न करतात. ते फक्त ‘ कोल्हे कुई ‘ करू शकतात. त्यांनी केलेली 5 कामे सुद्धा त्यांना सांगता येणार नाहीत. ही ‘कोल्हे कुई’ आपल्याला आता थांबवायची आहे. खासदार हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही” असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
आज केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे हे भरभरून निधी देणारे नेतृत्व आहे. माढाचे खासदार रणजीत निंबाळकर यांनी तर केंद्रातून रेकॉर्ड ब्रेक निधी आणला आहे . आपल्या भागामध्ये विविध विकास कामे केली आहेत. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा केंद्रामध्ये आपलं नेतृत्व असेल व राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाचे सरकार असेल. त्यामुळे विरोधी विचारांच्या नेत्याला खासदार म्हणून निवडून देण्यात काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांचा हा शेवटचा प्रयोग आहे. नाटकात जसा शेवटचा अंक असतो. पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे आता चालणार नाही. यासाठी प्रेक्षकांनी म्हणजेच जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा. त्यांनी ५ वर्ष राजकीय नाटक केले आणि आपला विकास थांबवला. यामुळे आता त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात परत पाठवण्याची वेळ आली आहे, असा सणसणीत टोलाही यावेळी प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला
-…म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
-अनर्थ टळला: सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप
-“पुण्याचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी मोहोळांनी केलेले काम कौतुकास्पद” – रामदास आठवले
-कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…