पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील स्वर्गीय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या शक्तिस्थळ येथील स्मारकास भेट देऊन शिरुरचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभिवादन केले. ‘स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची मला प्रत्येक निवडणुकीत नेहमी मोलाची साथ लाभली’, असल्याचं आढळराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
‘शिरूर तालुक्यात काम करत असताना नेहमी आम्हाला संताजी धनाजी ची जोडी म्हणून ओळखले जात होते. त्यांची उणीव नेहमी भासत राहील. स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. विकासकामे करताना, लोकांचा संचय करताना त्यांना मी पाहिलंय. लोकं जमविण्याचा त्यांना छंद होता. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ चांगले व्हावे यासाठी त्यांनी स्वप्न पाहिले होते”, असंही शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
समाधी स्थळ विकासासाठी प्रथम आराखडा आम्हा दोघांनी तयार केला होता. वेळोवेळी त्यास गती देण्याचे काम केले. आज यास मोठा निधी मंजूर झाला असून त्याचे श्रेय केवळ स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचेच असल्याचंही आढळराव पाटलांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू?, पण आता मी बच्चा राहिलो नाही” -उदयनराजे भोसले
-“हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार”- नाना भानगिरे
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मेगाप्लॅन‘; असे पोहचणार १० ते १२ लाख नागरीकांपर्यंत