पुणे : राज्यातील चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. आढळराव पाटलांनी प्रचाराचा चांगलाच सपाटा लावला आहे. सोमवारी आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. तर पेठ पंचायत समिती आणि मंचर पंचायत समिती कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यातून आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
“शिरूर लोकसभेचा विकास सोडून लोकांना चंदेरी दुनियेत घेऊन जायचं आणि खोटी आश्वासन दाखवायची. त्यांना वाटतं की निष्ठा निष्ठा म्हणत शरद पवारांसोबत आहे. लोक पवार साहेबांच्या नावानं मत मागणारी असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे. आपण वेगळे आहोत. शरद पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले आहेत. आता मतं मागायची असतील तर तुम्ही केलेल्या विकासावर मागा. मागील पाच वर्षात तुम्ही काय योगदान दिलं ? काय काम केलीत ? यावर मत मागा”
आढळराव पाटलांनी केलेल्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी प्रत्यत्तर दिले आहे. “शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच. त्यामुळे पवार साहेबांच्या नावावर निवडणुक होतेय. याचे दिवस जुने झाले तर त्यांचे विचार त्यांना लखलाभो. पवार साहेबांनी महाराष्ट्रात संपुर्ण महाराष्ट्रसाठी काय केलं हे प्रत्येक जण जाणतो”, असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळरावांना प्रत्यत्तर दिलं आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीशी, जनतेशी आणि देशाच्या विकासासाठी एकनिष्ठ असे समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी महायुतीच्या नेतृत्वाखाली विजयी होणासाठी सज्ज झाल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: गुरवारी पाणी पुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेकडून आवाहन
-आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार
-जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा; मोठे कारण आले समोर…