शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना एक लाखांचे मताधिक्य देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच, त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागूया. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी माझी” अशी घोषणाच महेश लांडगे यांनी करून टाकली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला आमदार महेश लांडगे, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांच्यासह पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-बारामती, शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू; ७ मे रोजी होणार मतदान
-पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी
-“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”