पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये सध्या चांगलेच वाकयुद्ध रंगल्याच पाहायला मिळत आहे. कोल्हे हे गेल्या पाच वर्षात मतदारसंघामध्ये न फिरण्याचा मुद्दा वारंवारपणे मांडला जात असून नागरिकांमध्ये देखील याच मुद्द्यावरून कोल्हें विरोधात नाराजीचा सुरू पहायला मिळत आहे. तर कोल्हे यांच्याकडून देखील टीकेची झोड उठवली आत आहे. यामध्ये आता अमोल कोल्हे म्हणजे राजकारणातील दुसरे संजय राऊत असल्याचा टोला आढळराव पाटील यांनी लगावला आहे.
“शिरूरचे खासदार कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केली. कोल्हे यांनी ५ वर्षात काय काम केले, हे दाखवावे”, असे आव्हानही आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना दिले आहे.
“शिरूरच्या विद्यमान खासदारांनी ५ वर्षात काहीच काम केले नाही. मात्र त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना ५ वर्षात काय काम केले हे दाखविता येत नाही. मी खासदार असताना केलेल्या कामाची उद्घाटने कोल्हे करत आहेत. ५ वर्षात ते मदारसंघात फिरकले नाहीत, मात्र त्यानंतरही निवडणूक लढविताना त्यांना लाज वाटत नाही”, अशी टीका आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्ही सून असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही’; अजित पवारांनी पुन्हा काकांना डिवचलं
-“ईव्हीएमचे बटन कचाकचा दाबा पण, बटन दाबताना हात आखडता घेतला तर माझा पण…”- अजित पवार
-पुणे लोकसभेच्या मैदानात AIMIM ची एन्ट्री! तगडा उमेदवार देत काँग्रेससह धंगेकरांची डोकेदुखी वाढवली