पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात तुफान खडाजंगी सुरु आहे. डमी उमेदवार आणि डॅडी उमेदवारावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि आता ‘विरोधक रडीचा डाव खेळत’ असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केला आहे. यावर आता शिवाजी आढळराव पाटलांनी प्रतिउत्तर देत ‘तू पोलीसांत गुन्हेगार त्याला मी काय करणार’, अशा शब्दात आढळराव पाटील म्हणाले आहेत.
अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आपेक्ष घेण्यात आल्यानंतर अर्ज वैध ठरला यावरुन अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना लक्ष करत ‘विरोधकांकडून रडिचा डाव खेळला’ गेल्याचा आरोप केला याला प्रतिउत्तर देत आढळराव पाटलांना कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हेंचा अर्ज काही एक गुन्हा लपवल्यामुळे अवैध ठरला होता. मात्र त्यानंतर अर्ज वैध ठरला. गुन्हे तुम्ही करायचे आणि आम्ही षडयंत्र रचलं म्हणून आरोप करायचे. पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच आता अमोल कोल्हेंना फक्त आणि फक्त आढळराव पाटील दिसायला लागले आहेत, असा टोला आढळराव पाटील यांनी लगावला आहे. तसेच ‘फार काळजी करण्याची गरज नाही, पुढील १५ दिवस शांततेत प्रचार करायचा आहे’, असं आवाहनही आढळरावांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…
-शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?
-‘मी केलेली काम आपल्या पुस्तकात छापतात!’ अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना विचारला जाब
-मोदींसाठी महायुती एकवटली, काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या सभेवरून मात्र नवा वाद
सावधान! कृत्रिम साखर वापराताय तर आधी ‘ही’ संपूर्ण माहिती वाचाच…