पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिरुरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर सडकून टीका करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शिरुरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार जोरदार टीका केली आहे. मोहिते पाटलांनी कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला शरद पवारांना जबाबदार धरल्याचं पहायला मिळालं आहे. “शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते”, असे दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.
“शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगलाच सुखावला असता”, असं मोहिते पाटील म्हणाले. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही उत्तर दिलं आहे.
“देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे. देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंदी करण्यात आली. तुमचं सरकार असं करत असेल तर तुम्ही झोपा काढत होता का?” असा सवाल जयंत पाटलांनी मोहिते पाटलांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा
–श्री राम नवमी! रामनवमी का साजरी केली जाते? काय आहे यामागचे कारण? जाणून घ्या…
-हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…